दैनंदिन ठेव योजना (पिग्मी डिपॉजिट)
दैनंदिन ठेव
''थेंबे थेंबे तळे साचे"
अशी आपल्याकडे एक म्हण आहे.
त्यानुसार ही ठेव योजना तयार केलेली आहे.
या ठेवप्रकारामधे खातेदाराच्या खात्यामध्ये खातेदार दररोज पैसे जमा करू शकतो. ही रक्कम दहा रुपयांपासून कितीही असू शकते. दररोज पैसे जमा केल्याने, याला दैनंदिन ठेव योजना म्हटले जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पतपेढीचा अधिकृत प्रतिंनिधी खातेधारकाच्या व्यवसाय ठिकाणी किंवा घरी दररोज जाऊन पैसे गोळा करतो.
. रोजगाराची कमाई करणार्यांना, लहान व्यापार्यांना आणि शेतकर्यांना बचतीची सवय लावण्यास मदत करण्यासाठी आणि लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी इत्यादी मोठ्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी ही योजना सुरू केली गेली. भारतातील इतर बँका पेक्षा विठाई ने त्यांना बँकिंग सिस्टमचा एक अविभाज्य घटक मानले आहे आणि बहुतेकदा या कायदेशीर सूक्ष्म बाजारपेठ आणि व्यापारामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीच्या विकासास हातभार लागला आहे. महाराष्ट्रात, फंड डिपॉझिट सिस्टमचे आधारस्तंभ म्हणून या प्रतिंनिधीशिवाय बँकिंग व्यवस्था पूर्ण होत नाही;
संस्थेचा अधिकृत ठेव संकलन प्रतिंनिधी खातेदारांच्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जावून मोबाईलद्वारे रक्कम जमा करेल. ग्राहकांच्या खात्यास रजिस्टर केलेल्या मोबाईलवर सदर रक्कम जमा झाल्याचा मेसेज येईल. तसेच प्र्तिनिधी खातेदाराच्या पासबुकमध्ये रक्कमेची नोंद करेल.
दर तीन महिन्यातून एकदा खाते पुस्तक कार्यालयातून तपासणी करून दिले जाईल.