व्यावसायिक कर्ज

व्यावसायिक कर्ज

१) संकल्पना :- ग्रामीण व शहरी भागातील छोट्या-छोट्या व्यावसायिकांना / पगारदार यांना दैनंदिन व्यवहारा करिता अल्प स्वरुपात खेळते भांडवल याची आवश्यकता असते व अश्या खेळत्या भांडवलाच्या आधारेच ते दररोज चा व्यवसाय करून मिळणाऱ्या रक्कमेतून आपला व्यवहार,बचत व कर्ज हप्ते भरणा करीत असतात अशा कर्जाची आवश्यकता हि वारंवार पडत असते तसेच अश्या कर्जाचा कालावधी देखील कमी असतो , आपल्या व्यवसायाच्या दैनंदिन व्यवहारातून काही रक्कम हि दररोज /प्रती माह संस्थेत /बँकेत भरणा करून त्यतून कर्ज हप्ते भरून कर्जे नियमित ठेवली जातात २) सूक्ष्म कर्ज वाटपाची व्याप्ती :- भारतीय अर्थ व्यवस्थेत सर्वात जास्त रोजगार या क्षेत्रात असून देखील मोठ्या प्रमाणावर हे क्षेत्र असंघटीत असून या क्षेत्राला लागणार्या एकूण वित्त पुरवठ्या पैकी केवळ ३२ टक्के एवढाच वित्त् पुरवठा हा बँक किंवा इतर वित्तीय संस्थेद्वारे केला जातो व इतर ६८% वित्तीय पुरवठ्याची गरज हि सावकार ,वैयक्तिक गुंतवणूक यांच्या द्वारे भागवली जाते , राज्या अनुसार सदर वित्तीय पुरवठ्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी खूप मोठी तफावत या आकड्यांमध्ये दिसून येत नाही. त्या मुळे सदरील क्षेत्रात वित्त पुरवठा करण्यास मोठ्या प्रमाणावर वाव असून अर्थव्यवस्थेची देखील ती गरज आहे. ३) कर्ज रक्कम :- जास्ती जास्त २ लाख रु (अक्षरी -दोन लाख रु कर्ज) ४) कालावधी :- एक ते दोन वर्ष ५)कर्जदार यांचा व्यवसाय मागील किमान तीन वर्षा पासून सुरु असावा ६)सिबिल :- ७०० पेक्षा अधिक स्कोर असावा ७)कर्जदार यांचा व्यवसाय शाखे पासून १५ किमी पेक्षा जास्त अंतरावर नसावा ८)वय :- कमीत कमी वय हे २५ वर्ष असावे व जास्तीत जास्त ५० वर्ष ९)शॉप act लायसन अथवा आधार उद्योग

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा


Let us help your business grow!